आशिया खंडातील सर्वात श्रीमंत गाव 'हिवरे बाजार' - Developed village
🎬 Watch Now: Feature Video
अहमदनगर - हिवरे बाजार हे केवळ एक गाव नसून, ते परिपूर्ण विकासाचे आदर्श संकल्पचित्र आहे. हे गाव राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील नावाजलेले आहे. आशिया खंडातील सर्वात श्रीमंत गाव म्हणून हिवरे बाजार या गावाची ओळख आहे. यासाठी या गावाचे सरपंच पोपटराव पवार यांचे महत्वाचे योगदान आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील इतर गावांप्रमाणेच हिवरे बाजार हे गाव सिंचनाच्या अपुऱ्या सुविधा, अनियमित पाऊस, शेतमालाला मिळणारा कमी भाव, गावात रोजगार संधींचा अभाव अशा अनेक समस्यांनी या गावातील नागरिकांना ग्रासले होते. मात्र, बाहेर शिकायला गेलेल्या तरुण पिढीपैकी पोपटराव पवार यांनी बाहेर शिक्षण घेल्यानंतर गावातच काम करायचे या निर्धाराने ते गावी परतले. त्यानंतर त्यांनी जोमाने काम सुरू केले आणि अनेक सुविधांपासून वंचित असलेल्या हिवरे बाजार गावाचा कायापालट केला. आज आशिया खंडातील सर्वात श्रीमंत गाव म्हणून स्वतंत्र ओळख या गावाने निर्माण केली आहे.