नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तिवसा येथे पोलिसांचा रूट मार्च - पोलीस रूट मार्च तिवसा

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Dec 20, 2021, 8:21 PM IST

अमरावती - जिल्ह्यातील तिवसा व भातकुली येथील नगरपंचायत निवडणुकांसाठी उद्या मतदान होणार आहे. तिवसा नगरपंचायतीच्या १४ जागांसाठी ६२ उमेदवार रिंगणात आहेत. तर, भातकुली नगरपंचायतीच्या १६ जागांसाठी ६० उमेदवार रिंगणात आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी तिवसा शहरात पोलिसांनी आज रूट मार्च काढत शक्ती प्रदर्शन केले. भातकुली येथील निवडणुकीसाठी ६ हजार ४२६ मतदार असून, तिवसा येथील निवडणुकीसाठी ९ हजार ६९३ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. तर, दुपारी ईव्हीएम मशीन मतदान केंद्रावर रवाना झाल्या.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.