thumbnail

By

Published : Jan 12, 2022, 6:45 PM IST

Updated : Jan 12, 2022, 8:16 PM IST

ETV Bharat / Videos

उमरखेड डॉक्टर हत्या प्रकरण; पंधरा पैलूवर पोलिसांचा तपास - डॉ. खंडेराव धरणे

यवतमाळ - जिल्ह्याच्या उमरखेड येथे काल एका डॉक्टरची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या घटनेनंतर आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीस विभागाने पाच पथक तयार केले असून या प्रकरणचा 15 पैलूंवर तपास केला जात आहे. राजाराम प्रभाजी उत्तरवार शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर हनुमंत धर्मकारे यांची काल गोळ्या झाडून निर्घृण हत्या झाली. पोलिसांनी एकूण 15 पैलूंवर तपास या प्रकरणी सुरू केला असून 5 पथके या प्रकरणाचा उलगडा करण्यासाठी कार्यान्वित केली आहे. आयएमए व मॅग्मो या संघटनेतील डॉक्टरांनी थेट जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत धडक देऊन पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्यापुढे समस्यांचा पाढा वाचला. तत्पूर्वी बैठकीत देखील आमदार डॉ. संदीप धुर्वे यांनी पोलीस प्रशासनाला धारेवर धरले. मारेकऱ्यांना तात्काळ अटक करण्यात यावी. तसेच, आरोपींना कठोर शिक्षा देण्यासाठी कार्यवाही करून त्यांच्या कुटुंबीयांना न्याय देण्यात यावा, अशी मागणी यावेळी डॉक्टरांनी केली. सध्या उमरखेड येथील सर्व शासकीय वैद्यकीय अधिकारी यांनी काम बंद ठेवले आहे आणि २४ तासांमध्ये मारेकऱ्यांना अटक न झाल्यास उद्या पूर्ण यवतमाळ जिल्हा व नंतर संपूर्ण महाराष्ट्रभर आयएमए तर्फे डॉक्टरांचा काम बंद आंदोलन सुरू होईल, असा ईशारा आयएमएने दिला आहे.
Last Updated : Jan 12, 2022, 8:16 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.