"आमचा गाडा विधानसभेच्या शर्यतीत उतरणार हे नक्की...", राजेंद्र मस्के यांचा निवडणूक लढवण्याचा निर्धार - Assembly Election 2024 - ASSEMBLY ELECTION 2024
🎬 Watch Now: Feature Video
Published : Sep 29, 2024, 3:32 PM IST
बीड : भाजपाचे बीड जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी मी बीड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याची इच्छा व्यक्त केलीय. "आमचा गाडा विधानसभेच्या शर्यतीत उतरणार. फक्त कोणते बैल या बैलगाड्याला लावायचे हे ठरणं बाकी असल्याचं म्हणत राजेंद्र मस्के यांनी विधानसभा निवडणुकीत उतरण्याचा निर्धार केलाय. बीडमध्ये आयोजित मराठवाडा केसरी बैलगाडा शर्यतीच्या उद्घाटन प्रसंगी राजेंद्र मस्के माध्यमांशी बोलत होते. गेल्यावर्षी आयोजित करण्यात आलेल्या बैलगाडा शर्यतीवेळी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी मस्के बीड विधानसभा लढणार असल्याचं जाहीर केलं होतं. या पार्श्वभूमीवर आता मी पक्षाकडे उमेदवारीची मागणी केलीय. त्यानुसार मला उमेदवारी उमेदवारी मिळेल, अशी अपेक्षा देखील मस्के यांनी व्यक्त केली. त्यांच्या या दावेदारीमुळं आता बीड मतदारसंघात महायुतीमधील पेच आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळं आता बीड मतदार संघात महायुतीमध्ये बंडखोरी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.