ETV Bharat / politics

"महाराष्ट्राचा बैल बाजार...", राऊतांच्या टीकेचा सदाभाऊ खोत यांनी घेतला समाचार - Sadabhau Khot On Sanjay Raut

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : 2 hours ago

Cow Rajya Mata : संजय राऊत यांनी महायुतीतल्या नेत्यांना बैलांची उपमा देऊन बैलांचा अपमान केलाय. त्यामुळं संजय राऊत यांनी यासंदर्भात माफी मागावी, अशी मागणी खोत यांनी केलीय. तर मंत्री हसन मुश्रीफ यांनी गोमातेला 'राज्य माते'चा दर्जा देण्याच्या निर्णयाचं समर्थन केलंय.

Sadabhau Khot On Sanjay Raut
सदाभाऊ खोत, संजय राऊत (Source - ETV Bharat)

मुंबई Sadabhau Khot On Sanjay Raut : राज्य सरकारनं गोमातेला 'राज्य माते'चा दर्जा देण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता राज्यभर त्याचे पडसाद उमटू लागले आहेत. अनेक संघटनांनी सरकारच्या या निर्णयाचं स्वागत केलं, तर काहींनी याला कडाडून विरोध करत टीका केली. शिवसेना (उध्दव ठाकरे) पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी या निर्णयावर टीका करताना महायुतीतील नेत्यांना बैलाची उपमा दिली. त्यांच्या या टीकेला रयत क्रांती संघटनेचे नेते आणि विधान परिषदेचे आमदार सदाभाऊ खोत यांनी प्रत्युत्तर दिलं.

संजय राऊत यांनी माफी मागावी : "गाईच्या शरीरात 33 कोटी देवांचा वास असतो, म्हणून आपण गाईला गोमाता म्हणतो. त्यामुळं राज्य सरकारनं गोमातेला 'राज्य माते'चा दर्जा देण्याचा निर्णय घेतलाय, त्यात काहीही वावगं नाही. आपण गाईची पूजा करतो. गाईच्या दुधापासून, शेणापासून अनेक वस्तू आणि पदार्थ आपण तयार करतो. बैलाची देखील आपण पूजा करतो. शेतीचा शोध लागल्यानंतर पहिलं अवजार बैलाच्या खांद्यावरून आपण शेतात पाठवलं. शेतातील धान्य पिकवण्यात बैलाचं योगदान मोठं आहे. त्यामुळं बैलाला पित्याचा दर्जा देण्यात यावा, असं असताना संजय राऊत यांनी महायुतीतील नेत्यांना बैलांची उपमा देऊन बैलांचा अपमान केलाय, त्यामुळं संजय राऊत यांनी ताबडतोब माफी मागितली पाहिजे, अशी मागणी आमदार सदाभाऊ खोत यांनी केली.

सदाभाऊ खोत यांची प्रतिक्रिया (Source - ETV Bharat Reporter)

राऊतांचा हात भ्रष्टाचाराच्या गटार गंगेत : "संजय राऊतांनी कधी गाय, म्हैस, बैल पाहिला नाही. त्यामुळं त्यांना गाय काय आहे हे कसं समजणार. ज्यांचा हात भ्रष्टाचाराच्या गटार गंगेमध्ये आहे, त्यांचा हात शेणात कधी जाणार नाही," असं म्हणत सदाभाऊ खोत यांनी राऊतांवर निशाणा साधला.

संजय राऊत नेमकं काय म्हणाले? : "गाईला राज्यमाता करून गाईचं रक्षण कसं करणार? गाईच्या दुधाला भाव द्या, त्यावर चर्चा होणं गरजेचं आहे. पण ज्यांची बुद्धी बैलाची आहे, त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार. दिल्लीतून काही बैल येत असतात, काही केंद्रातून फिरत असतात. महाराष्ट्राचा बैल बाजार केलेला आहे," असं संजय राऊत म्हणाले होते.

आम्ही स्वागत करतो : दरम्यान, यासंदर्भात राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते हसन मुश्रीफ यांनी सरकारच्या निर्णयाचं समर्थन केलंय. "हिंदू धर्मात गायीला अत्यंत पवित्र स्थान आहे आणि गाईला मातेचा दर्जा देणं निश्चितच कौतुकास्पद आहे. त्यामुळं सरकारच्या या निर्णयाचं आम्ही स्वागत आणि समर्थन करतो," असं ते म्हणाले.

हेही वाचा

  1. आमदार अतुल बेनकेंना पक्षात घेऊन उमेदवारी द्या; शरद पवारांकडं कोणी केली मागणी? - MLA Atul Benke
  2. गाईला ‘राज्य गोमाता’ घोषित केल्यानंतर राजकीय वातावरण तापले, सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली - Maharshtra Cow RajyaMata
  3. 'फडणवीसांनी उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली...', वंचित बहुजन आघाडीचा दावा - Thackeray Vs Fadnavis

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.