नवी दिल्ली Virat Kohli Bowling : विराट कोहलीच्या नावावर क्रिकेटमधील फलंदाजीचे अनेक विक्रम आहेत. पण गोलंदाजीत त्याच्या नावावर विश्वविक्रम असेल तर नवलच कारण तो फार क्वचित प्रसंगी गोलंदाजी करतो. तथापि, कधीकधी तो कसोटी, एकदिवसीय किंवा T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गोलंदाजी करताना दिसला आहे. क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅट म्हणजे T20 मध्ये, विराट कोहलीनं एकदा असे काही आश्चर्यकारक केलं जे जगातील कोणत्याही गोलंदाजानं विराटच्या आधी किंवा नंतर केलं नाही.
Virat Kohli is the only bowler to take a wicket without bowling a single ball 🔥🐐.#ViratKohli pic.twitter.com/jt1JpI55aR
— ENGINEERING🚁 (@Appuro45_) April 29, 2023
विक्रम करणारा एकमेव गोलंदाज : विराट कोहली हा जगातील एकमेव असा गोलंदाज आहे, ज्यानं T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वैध चेंडू टाकण्यापूर्वीच खेळाडूला बाद केलं आहे. म्हणजेच त्याला अशा चेंडूवर विकेट मिळाली जो पंचांनी वैध घोषित केला नाही. ही अनोखी घटना केव्हा घडली हे तुम्हाला माहीत आहे का? 2011 मध्ये भारतीय संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर गेला होता आणि त्यादरम्यान दोन्ही संघांमध्ये T20 मालिकाही खेळली गेली होती.
Virat Kohli is the 1st bowler to Getting a wicket on the zeroth ball of his career #HappyBirthdayKingKohli pic.twitter.com/5Frq0gpMSE
— Ansh (@141Adelaide_) November 4, 2023
विराटनं केली गोलंदाजी : 31 ऑगस्ट 2011 रोजी झालेल्या या मालिकेतील एका सामन्यात विराट कोहलीनं गोलंदाज म्हणून विश्वविक्रम केला होता. एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली खेळल्या गेलेल्या या सामन्यात विराट कोहलीनं 3 षटकं टाकली आणि 22 धावांत एक विकेट घेतली. जेव्हा धोनीनं विराटकडे बॉलिंगसाठी बॉल सोपवला तेव्हा त्याला डावातील 8वं षटक टाकायचं होतं. डावातील हे 8वं षटक असलं तरी या सामन्यातील विराटचं पहिलंच षटक होतं.
वाईड बॉलवर घेतली विकेट : विराट कोहलीनं त्याच्या पहिल्या षटकाचा पहिला चेंडू त्यावेळी क्रीजवर असलेल्या केविन पीटरसनला टाकला. विराटचा हा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर गेला आणि पीटरसन तो खेळण्यासाठी आधीच बाहेर आला होता. धोनीनं अजिबात उशीर न करता चेंडू घेतला अन् ताबडतोब स्टंप विखुरला आणि पीटरसनला स्टंप आऊट घोषित करण्यात आलं. पण हा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर होता, त्यामुळं अंपायरनं त्याला वाईड बॉल घोषित केलं.
Wicket with the zeroth ball: Virat Kohli is the only bowler in international cricket to take a wicket with his zeroth ball in a format. In a Twenty20 International against England in 2011 😍#12YearsOfViratKohli #ViratKohli @imVkohli pic.twitter.com/VH9CDp70r2
— SAI. (@KOHLIfan183) August 18, 2020
T20 मध्ये चार विकेट : अशाप्रकारे, विराटला वैध चेंडू टाकण्यापूर्वीच, म्हणजेच त्याच्या वाइड बॉलवरच विकेट मिळाली. T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गोलंदाजानं पहिला वैध चेंडू टाकण्यापूर्वीच विकेट घेण्याची ही पहिलीच वेळ होती. या सामन्यात भारताचा 6 गडी राखून पराभव झाला. विराटनं T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 125 सामन्यांत 4 विकेट घेतल्या आहेत.
हेही वाचा :