Free Cereal Vending Machine Pune : गोरगरिबांसाठी पुण्यात लावले भारतातील पहिले मोफत अन्नधान्य व्हेंडिंग मशीन
🎬 Watch Now: Feature Video
गोरगरिबांसाठी पुण्यातील स्वयंसेवी संस्थांनी ( NGOs In Pune ) एकत्र येत मोफत अन्नधान्य वितरण करणारे व्हेंडिंग मशीन ( Free Cereal Vending Machine ) लावले आहे. रिपब्लिकन पक्षाचे नगरसेवक सिद्धार्थ धेंडे ( Corporator Siddharth Dhende ) यांच्या येरवडा प्रभागात गरजू नागरिकांना यामाध्यमातून मोफत अन्नधान्य मिळणार आहे. मशीनमध्ये दोन भाग असून, दोन्हींना एक - एक हजार किलोची क्षमता आहे. धान्य घेण्यासाठी प्रत्येक कुटुंबाला स्मार्ट कार्ड देण्यात येत आहे. प्रत्येकी ५ किलो गहू आणि ५ किलो तांदूळ याद्वारे मिळेल. कोरोनाकाळात विधवा झालेल्या महिलांना यात प्राधान्य राहणार आहे. रे ऑफ जॉय फाउंडेशन ( Ray Of Joy Foundation ), यश फाउंडेशन ( Yash Foundation ), हेल्थ अँड केअर ( Health And Care ) या तिन्ही संस्थांच्या एकत्रित प्रयत्नातून ही संकल्पना सुरू केली. रेशनचा काळा बाजार ( Black market of rations ) थांबवणे, गरजूंना 24 तास धान्य उपलब्ध करून देणे, चांगल्या प्रतीचे अन्नधान्य गरजूंना मोफत देणे हे या संस्थानचे उदिष्ट आहे. भविष्यात सर्व भारतभर हा प्रकल्प राबविण्याचा संकल्प असल्याचे यावेळी संस्थेचे प्रतिनिधी शोन शिरोळे, अश्विनी गायकवाड यांनी सांगितले. तसेच येणाऱ्या काळात पुण्यात 20 ठिकाणी असे मशीन बसवण्याचा मानस असल्याचे धेंडे यांनी सांगितले.