Omicron Variant : महापौर किशोरी पेडणेकरांनी विमानतळाची पाहणी करून घेतला आढावा - किशोरी पेडणेकरांची विमानतळाला भेट
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई : ओमिक्रॉन व्हॅरिएन्टच्या(Omicron Variant) पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर(Kishori Pednekar) व उप महापौर ऍड.सुहास वाडकर यांनी सोमवारी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची कशा पद्धतीने तपासणी करण्यात येते याची पाहणी करून योग्य ते निर्देश दिले. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून देखील नवे नियम जारी करण्यात आले आहे. नव्या नियमानुसार जर कोणी विनामास्क आढळल्यास त्याच्याकडून 500 रुपयांचा दंड आकारण्यात येत आहे. तर जर एखादा ग्राहक हा विनामास्क खरेदी करताना दिसल्यास संबंधित दुकानदाराकडून दहा हजारांचा दंड वसूल करण्यात येणार आहे. मॉलमध्ये विनामास्क व्यक्ती आढळून आल्यास मॉल मालकाला तब्बल पन्नास हजारांचा दंड करण्यात येणार आहे.