VIDEO : पंधरा फूट खोल खड्डयात पडलेल्या मुलीला वाचवण्यात यश - etv bharat live
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-13584723-241-13584723-1636457688919.jpg)
अहमदनगर - जिल्ह्यातील कोपरगाव शिवारात चार वर्षाची ईश्वरी गंगवणे ही चिमुकली बांधकामाच्या बोरअवेलसाठी खणलेल्या खड्डयात पडली होती. मुलीला दीड तासाच्या प्रयत्नानंतर बाहेर काढण्यात यश आले आहे. तिच्या हाताच्या चार बोटांना जखमा झाल्या आहेत. तिच्यावर कोपरगाव जवळील संत जनार्दन स्वामी रुग्णालायात उपचार सुरु आहेत. कातकाडे पेट्रोल पंपा जवळील मोहीनी नगर भागातील नगर - मनमाड महामार्गाजवळील मोकळ्या जागेत अंदाजे पंधरा फुट खोलाचे काही खड्डे खोदण्यात आले होते. ईश्वरी आपल्या आईसोबत बाहेर जाण्यासाठी निघाली होती. तेव्हा जाताना ती अचानक खड्डयात पडली. आपली मुलगी पडल्याचे समजताच तिच्या आईने स्थानिकांना बोलावले. कोपरगाव पोलिस आणि महसूल विभागाचा कर्मचाऱ्यांनी जेसीबीच्या सहाय्याने मुलीला सुखरुप बाहेर काढले.