बारामतीत गौरीच्या देखाव्यातून सांगितले वृक्षारोपणाचे महत्व - बारामती लेटेस्ट न्यूज
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-13054865-thumbnail-3x2-baramati.jpg)
बारामती - डोर्लेवाडी परिसरात दरवर्षीच गौरी गणपतीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सार्वजनिक गणेश उत्सवाला मर्यादा आल्या आहेत. मात्र, घरोघरी गणेशाची स्थापना करून महिलांनी गौरीचा सण नियमांचे पालन करून साजरा केला आहे. डोर्लेवाडी येथील श्वेताली सोमनाथ भिले यांनी यावर्षी आपल्या घरी पर्यावरण पूरक गणेशाची स्थापना केली आहे. आकर्षक झाडांच्या कुंड्यांनी सजावट करून नैसर्गिक माती व रंग वापरून गणेशाची मूर्ती तयार केली आहे. तसेच गेल्यावर्षी पासून संपूर्ण जगावर कोरोनाचे संकट आले आहे. कोरोना काळात रुग्णांना ऑक्सिजनची फार कमतरता जाणवली, त्यामुळे यंदाची गौरी सजावट तिने कोरोनाचा देखावा करून वृक्षारोपणाचे महत्व सांगितले. गौरी सजावटीमध्ये पर्यावरण जागृतीचे अनेक संदेश दिले आहेत. त्यामुळे हळदी कुंकवासाठी येणाऱ्या महिलांनी तिच्या या उपक्रमाचे कौतुक केले आहे.