'हॅलो, मी गृहमंत्री अनिल देशमुख बोलतोय'; नववर्षातील पहिली तक्रार चक्क गृहमंत्र्यांनी स्वीकारली
🎬 Watch Now: Feature Video
गृहमंत्री अनिल देशमुखांनी पुण्यातील नियंत्रण कक्षात बसून नववर्षातील पहिला तक्रारीचा फोन घेतला. समोरील व्यक्तीची संपूर्ण तक्रार ऐकून घेत त्यांनी त्यांची नोंदही केली. चक्क राज्याचे गृहमंत्री आपल्यासोबत बोलत आहेत याचा तक्रारकर्त्यालाही धक्का बसला. संपूर्ण तक्रार ऐकल्यानंतर गृहमंत्र्यांनी समोरील व्यक्तीला योग्य कारवाईची ग्वाही दिली. तसेच गृहमंत्री देशमुख यांनी त्या व्यक्तीला नववर्षाच्या शुभेच्छाही दिल्या.