Amit Shah on Uddhav Thackeray :..तर राजीनामा द्या अन् मैदानात उतरा, अमित शाह यांचे उद्धव ठाकरेंना आव्हान - अमित शाह यांची उद्धव ठाकरेंवर टीका
🎬 Watch Now: Feature Video
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा राजीनामा मागितला आहे. सरकार चालवणे जमत नसेल तर राजीनामा द्या, अशा स्पष्ट शब्दात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा राजीनामा मागितला आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार हे मातोश्रीवरील बैठकीत ठरलं होतं. मुख्यमंत्री पदासाठी शिवसेनेने हिंदुत्व बाजूला ठेवून ज्यांच्याशी लढले त्यांच्याच मांडीवर जाऊन बसले आहेत. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचं होतं म्हणून 2019 मध्ये भाजपसोबत विश्वासघात केला. सत्तेतून पायउतार व्हा आणि मग मैदानात उतरुन दोन - दोन हात (Amit Shah on Uddhav Thackeray) करु. जनता कुणाला कौल देते हे पाहूयात. तिन्ही पक्षाने एकत्र लढून भाजपला हरवून दाखवावे, असे आव्हान केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी दिलं.