Digital Currency - डिजिटल चलन पॅन आणि आधारशी लिंक हवे, एमसीआयचे दीपक शिकारपूर यांची प्रतिक्रिया
🎬 Watch Now: Feature Video
पुणे - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. सीतारामन यांचा हा चौथा तर, मोदी सरकारचा हा दहावा अर्थसंकल्प आहे. यंदाच्या 2022 - 23 अर्थसंकल्पात कर, रेल्वे, आरोग्य, पायाभूत सुविधा, कृषी उद्योग, क्रीडा आणि इतरही क्षेत्रात भरीव तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय इतरही क्षेत्रासाठी तरतूद करण्यात आली असून, नवीन घोषणा करण्यात आल्या आहेत. डिजिटल करन्सीमुळे ( Digital currency )अर्थव्यवस्थेला मोठी उभारणी मिळत असून आरबीआयचे डिजिटल चलन येईल, असे सीतारामन यांनी सांगितले आहे. यावर एमसीसीआयचे दीपक शिकारपूर ( MCI Deepak Shikarpur ) यांनी प्रतिक्रिया दिली. शिकारपूर म्हणाले की, आज जो अर्थसंकल्प सादर झाला तो डिजिटल स्वरुपात झाला आहे. डिजिटल बुस्ट हा एक नवीन शब्द अर्थसंकल्पात दिसला. सर्वच क्षेत्रांना याचा फायदा होईल. सर्वच व्यवहार हे आपण जर डिजिटल करत असू तर, त्यासाठी लागणारी वीज आणि नेट उपलब्ध व्हायला हवे. महत्त्वाचे म्हणजे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या वतीने स्वतःची क्रिप्टो करन्सी डिजिटल रुपात ( Digital rupee ) आणत आहे आणि याआधी बिटकॉईन सारखी करन्सी आभासी चलन होत पण, ते पॅन आणि आधारला लिंक ( digital currency Aadhaar ) नसल्याने ती अर्थव्यवस्थेत येत नव्हते. रिझर्व्ह बँकेची डिजिटल करन्सी ही पॅन आणि आधारशी लिंक व्हायला पाहिजे, असे देखील शिकारपूर ( Deepak Shikarpur on digital currency ) म्हणाले.