ETV Bharat / entertainment

मालदिव बीचवर इब्राहिम अली खान आणि पलक तिवारी? नात्यावर शिक्कामोर्तब झाल्याची नेटिझन्सची चर्चा... - IBRAHIM ALI KHAN AND PALAK TIWARI

सैफ अली खानचा मुलगा आणि श्वेता तिवारीची मुलगी मालदिवमध्ये सुट्टी एन्जॉय करत आहे. दोघांच्या इन्स्टाग्रामवर त्यांचे फोटो दिसत असले तरी त्यांची लोकेशन्स एकच दिसत आहे.

Ibrahim Ali Khan and Palak Tiwari
इब्राहिम अली खान आणि पलक तिवारी ((IANS))
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Nov 16, 2024, 2:04 PM IST

मुंबई - सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खान आणि लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री पलक तिवारी एकमेकांना डेट करत असल्याच्या अफवा खूप जोरात वाहत आहेत. अनेकवेळा इब्राहिम आणि पलक यांना डिनर डेटवर एकत्र दिसले आहेत. अशातच आता आणखी एका कारणाची यात भर पडली आहे. खरंतर इब्राहिम आणि पलक हे मालदिवमध्ये सुट्टीचा आनंद घेत आहे. त्यांच्या मालदीव व्हेकेशनचे फोटो समोर आले आहेत. इब्राहिम आणि पलक एकाच ठिकाणी पूल व्हेकेशन एन्जॉय करत आहेत, असंच या फोटोवरुन दिसत आहे. त्यामुळे इब्राहिम आणि पलकच्या व्हेकेशनच्या फोटोंनी सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे.

इब्राहिम आणि पलकचे बीचवर एन्जॉय करतानाचा फोटो - इब्राहिम आणि पलक यांनी मालदीवच्या फुरावरी येथील त्यांच्या व्हेकेशनचे फोटो आपापल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये पलक तिवारी काळ्या रंगाच्या बिकिनीमध्ये दिसत आहे तर इब्राहिम निऑन शॉर्ट्समध्ये दिसत आहे. दोघांचे पोशाख आणि लोकेशन व्यवस्थित जुळत आहेत, त्यामुळे दोघेही एकाच ठिकाणी असल्याचा अंदाज प्रेक्षकांनी लावला आहे. या फोटोत पलक तिवारी अतिशय बोल्ड अवतारात दिसत आहे. इब्राहिम आणि पलकच्या फोटोंवर आता लोकांनी आपल्या प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे.

पलक आणि इब्राहिमने रिलेशनशिपचे दिले संकेत - फुरावरी बीचवरील पलक आणि इब्राहिमच्या फोटोंचे लोकेशन अगदी तंतोतंत जुळत आहेत. त्यामुळे पलक आणि इब्राहिम यांनी आपलं नातं घट्ट झाल्याचं संकेत दिल्याचीही चर्चा आहे. पलक आणि इब्राहिमने येथे कँडल लाईट डिनर देखील केलं आहे, याचे फोटोही त्यांनी शेअर केले असले तरी उघडपणे ही गोष्ट कबुल केलेली नाही. याबाबत अनेक नेटिझन्सचं म्हणणं आहे की, पलक आणि इब्राहिम बीचवर एकत्रच फिरत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.