Section 144 imposed in mumbai - मुंबईत ओमायक्रोनचे 13 रुग्ण; 16 दिवसांसाठी कलम 144 लागू - ओमायक्रोन मुंबई कलम 144
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - मुंबईसह संपूर्ण देशात ओमायक्रोन रुग्णांच्या संख्येत वाढ होता दिसत आहे. महाराष्ट्रात ओमायक्रोनचे 32 रुग्ण आहेत. मुंबईत रुग्णांची सख्या 13 आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत कलम 144 लागू करण्यात ( Section 144 imposed in mumbai ) आले आहे. ते 16 डिसेंबर ते 31 डिसेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहणार आहे. यामुळे मुंबईतील नववर्षाचे सेलिब्रेशन फिके पडू शकते. कलम 144 जाहीर झाल्याने मुंबई पोलिसांनी कडक बंदोबस्त वाढवला आहे. मुंबईतील दहिसर चेकनाक्यावर नाकाबंदी करून मुंबई पोलीस मोठ्या प्रमाणात कारवाई करताना दिसले. पोलीस मुंबईत प्रवेश करणाऱ्या सर्व वाहनांमध्ये बसलेल्या लोकांकडून लसीच्या दोन्ही डोसचे प्रमाणपत्र तपासताना दिसले. यावेळी दहिसरचे वरिष्ठ पोलीस अधिकारी प्रवीण पाटील म्हणाले की, शासनाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये लोकांना कोरोना नियमांचे पालन करण्यास सांगितले जात आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्क लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. ज्यांना कोरोना लसीच्या दोन्ही लसी मिळालेल्या नाहीत, त्यांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे. त्याशिवाय कलम 144 न पाळणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.