गुंडशाही, दमदाटी करणे ही भाजपची प्रवृत्ती -विश्वजित कदम - Maharashtra off news
🎬 Watch Now: Feature Video
पुणे - गुंडशाही आणि दमदाटी करणे ही भाजपची प्रवृत्ती आहे. आम्ही कोणालाही दमदाटी करून बंदमध्ये सहभागी केलेले नाही. शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घालून त्यांना चिरडून टाकणारी प्रवृत्ती ही भाजपची आहे. अशी प्रतिक्रिया राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी दिली आहे. ते लखीमपूर येथे झालेल्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडी सरकार तसेच विविध पक्ष संघटनांच्या वतीने (दि. 11 ऑक्टोबर)रोजी महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला होता. त्या पार्श्वभूमीवर पुण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाशेजारी निषेध सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. या बंदला सर्वसामान्य नागरिकांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे. लखीमपूर येथील घटना देशाला कलंक लावणारी घटना आहे. शेतकऱ्याच्या खांद्याला खांदा लावून राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्ष उभे आहेत. राज्यात तीन पक्षांचे सरकार आहे. या मनुवादी भाजप विरोधात तिन्ही पक्षांनी पुढे एकत्रित राहावे अशी अपेक्षाही कदम यांनी यावेळी व्यक्त केली आहे.