VIDEO नाशिकात भुजबळ, राऊत आणि चंद्रकांत पाटील एकाच सोफ्यावर; राजकीय चर्चांना उधान - भुजबळ राऊत चंद्रकांत पाटील एकाच सोफ्यावर
🎬 Watch Now: Feature Video
नाशिक - राजकारणात महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा सामना रंगत असताना या तिन्ही पक्षांचे नेते एकाच सोफ्यावर गप्पा मारत बसल्याच्या दृश्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. भाजप आ.प्रा. देवयानी फरांदे (Devyani Farande) यांच्या कन्येच्या विवाहसोहळ्यात हे घडले. येथे एकाच सोफ्यावर शिवनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut), भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil) आणि राष्ट्रवादीचे नेते तथा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) एकाच सोफ्यावर गप्पा मारताना दिसून आले. या सोहळ्याला सर्वपक्षीय नेत्यांनी हजेरी लावली होती. सकाळी नाशिकमध्ये आगमन झाल्यावर खासदार राऊत यांनी भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली होती. तर, मागील दौर्यात खासदार राऊत यांनी नांदगावला जाताना भुजबळांना अंगावर घेण्याची भाषा केली होती. भुजबळांनीही त्यास प्रत्युत्तर दिले होते. त्यामुळे, महाविकास आघाडीत खटके उडाले होते. मात्र, विवाहसोहळ्यात या तिन्ही नेत्यांमध्ये गप्पांची मैफल रंगल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे, राजकीय तर्क वितर्कांना उधाण आले होते.