Lata Mangeshkar : लता मंगेशकर यांचे कुटुंबीय अस्थि गोळा करण्यासाठी शिवाजी पार्कवर - lata mangeshkar latest news
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - भारतरत्न लता मंगेशकर यांचे काल दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्यावर काल सायंकाळी 7 वाजून 15 मिनिटांनी शिवाजी पार्कवर अंत्यसंस्कार करण्यात आले. भाऊ हृदयनाथ मंगेशकर यांनी बहिणीला मुखाग्नी दिला. दरम्यान, आज मंगेशकर कुटुंबीय अस्थी गोळा करण्यासाठी शिवाजी पार्कवर उपस्थित झाले आहे. यावेळी हृदयनाथ मंगेशकर यांचे चिरंजीव व लता मंगेशकर यांचे भाचे आदिनाथ मंगेशकर यांनी लता मंगेशकर यांच्या अस्थिंचे विधिवत पूजन केले. मिळालेल्या माहितीनुसार, लता मंगेशकर यांच्या अस्थि प्रभुकुंज या निवासस्थानी दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहेत.
Last Updated : Feb 7, 2022, 12:32 PM IST