अनिल देशमुखांनी पदाचा गैरवापर केल्यामुळेच त्यांना अटक झाली - जयश्री पाटील
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. कथित 100 कोटी रुपये वसुलीप्रकरणी पोलीस तसेच न्यायालयामध्ये अॅड. जयश्री पाटील यांनी तक्रार केली होती. या प्रकरणांमध्ये तपास यंत्रणेला कोणतीही मदत लागल्यास आपण तयार आहोत. तसेच आपण अनिल देशमुख यांच्या विरोधात तक्रार केल्यामुळे आपल्याला धमकीचे फोन येत आहेत. मात्र, आपण कोणत्याही धमकीला जुमानत नाही. तत्कालीन गृहमंत्री यांनी आपल्या पदाचा गैरवापर केल्यामुळेच त्यांना अटक झाली असल्याचे जयश्री पाटील यांनी सांगितले. त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी उमेश करंजकर यांनी...