ETV Bharat / entertainment

एआर रहमानच्या घटस्फोटानंतर पहिल्यांदाच पत्नी सायरा बानोनं सोडलं मौन, सांगितलं विभक्त होण्याचं कारण - AR RAHMAN SAIRA BANO DIVORCE

एआर रहमान आणि सायरा बोनोच्या विभक्त होण्यामांगचं कारण सायरा यांनी सांगितलं आहे. त्याची एक व्हॉईस नोट शेअर करण्यात आली आहे.

AR Rahman's divorce
एआर रहमान आणि सायरा बानो ((ANI))
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Nov 25, 2024, 1:16 PM IST

मुंबई - ऑस्कर विजेता संगीतकार ए आर रहमान आणि त्याची माजी पत्नी सायरा बानो विभक्त झाल्याची बातमी चांगलीच गाजली आहे. लग्नाच्या 29 वर्षानंतर हे जोडपं वेगळं झाल्याच्या बातमीनं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. दरम्यान ते दोघं विभक्त होण्यामागे त्याच्या बँडमधील एक वादक मोहिनी डे जबाबदार असल्याच्या चर्चाही रंगू लागल्या होत्या. दरम्यान, मोहिनी डेनं खुलासा करत याबाबतीतलं आपलं मौन सोडलं होतं. त्यामुळे रहमानच्या विभक्त होण्यामागचं खरं कारण काय आहे याबाबतीत लोक अंधारात होते. यापार्श्वभूमीवर पहिल्यांदाच एआर रहमानची विभक्त झालेली पत्नी सायरा बानो यांनी एका व्हॉईस नोटमध्ये खुलासा केला आहे. गेल्या काही ती शारीरिकदृष्ट्या अस्वस्थ आहे. यासाठी ती मुंबईत उपचार घेत आहे. त्यामुळं एआर रहमानच्या रिलेशनशिपला ब्रेक दिल्याचं तिनं म्हटलंय.

सायरा बानोची व्हॉईस नोट त्यांच्या वकील वंदना शाह यांनी शेअर केली आहे. व्हॉईस नोटमध्ये सायराने एआर रहमानचं कौतुक केलं आहे आणि लोकांना त्याचे नाव खराब करू नका असं आवाहनही केलं आहे. नोटमध्ये एआर रहमानची पत्नी लोकांना उद्देशून म्हणते, "मी सायरा रहमान आहे. मी सध्या मुंबईत आहे. गेल्या काही महिन्यांपासून मी शारीरिकदृष्ट्या निरोगी नाही, म्हणून मला एआरपासून वेगळं व्हायचे होतं, त्यामुळे सर्व यूट्यूबर, तमिळ मीडिया, यांना विनंती करते की, कृपया एआर रहमानबद्दल काहीही वाईट बोलू नका. तो एक रत्न आहे, जगातील सर्वोत्तम व्यक्तीपैकी तो एक आहे."

चेन्नई सोडण्याच्या निर्णयाबद्दल सायरा पुढं म्हणाली, "आजारपणामुळं मी चेन्नईतून बाहेर पडले. जर तुम्हाला कळलं की, मी चेन्नईत नाही तर मी कुठं असेन याचा विचार तुम्हाला पडेल. तर, सध्या मी मुंबईत आहे. माझ्यावरील उपचारासाठी मी इथं आली आहे. एआर रहमान कार्यक्रमात बिझी असल्यामुळं तो इथं येणं शक्य नव्हतं. याबद्दल मला कोणालाही त्रास देण्याची इच्छा नव्हती, अगदी मुलांना आणि त्यालाही. म्हणूनच मी इथं एकटीच आले आहे."

आपल्या पतीचे कौतुक करताना सायरा म्हणते, "तो जगातील सर्वोत्तम व्यक्ती आहे. माझी एवढीच विनंती आहे की, कृपया ते जसं आहेत तसं राहू द्या. ते कुणाशीही जोडले गेलेले नाहीत, मी त्यांच्यावर माझा जीव ओवाळीन टाकते. मी त्यांच्यावर प्रेम करते आणि त्यांचंही माझ्यावर भरपूर प्रेम आहे. त्यामुळे मी तुम्हाला नव्ह विनंती करते की, त्यांच्या विरोधात खोटे आरोप करणं बंद करा. माझी सर्वांना प्रार्थना आहे की, याकाळात आम्हाला एकांतात राहू द्या आणि आमची प्रायव्हसी राहू द्या. आतापर्यंत अधिकृतपणे काहीही जाहीर झालेलं नाही."

व्हाइस नोटच्या शेवटी सायरा बानो म्हणते, "मी लवकरच मुंबईहून चेन्नईला परत येईन. मला माझे उपचार पूर्ण करावे लागतील. उपचार पूर्ण झाल्यावर मी परत येईन. ठीक आहे? म्हणून, मी तुम्हाला विनंती करतो की कृपया त्याच्या नावाची बदनामी करणे थांबवा, कारण तो पूर्णपणे वेडेपणा आहे. मी आधी म्हटल्या प्रमाणं ते एक रत्न आहेत. धन्यवाद."

सायराआधी मोहिनी डे हिची प्रतिक्रिया - दरम्यान, याआधी बासिस्ट मोहिनी डे यांनी एआर रहमानच्या विभक्त होण्यावर तिची प्रतिक्रिया दिली होती. यासाठी मोहिनीने काही दिवसांपूर्वी तिची इन्स्टाग्राम स्टोरी पोस्ट शेअर केली होती. यात तिनं लिहिले होतं की, "मला मुलाखतीसाठी खूप रिक्वेस्ट येत आहेत. त्यांना माझ्याशी काय बोलायचं आहे हे मला चांगलं माहीत आहे, म्हणून मी त्यांच्या सर्व विनंत्या स्वीकारण्यास आदरपूर्वक नकार देत आहे. कारण निव्वळ फालतू गोष्टीत अडकण्यात मला रस नाही. माझा विश्वास आहे की माझी ऊर्जा अफवांवर खर्च करणं योग्य नाही. कृपया, माझ्या गोपनीयतेचा आदर करा."

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.