पुणे : छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांचा अश्वारूढ पुतळा आता सातासमुद्रापार जपानची राजधानी टोकियोमध्ये (Tokyo) उभारला जाणार आहे. 'आम्ही पुणेकर' या संस्थेनं या स्मारकासाठी पुढाकार घेतलाय. येत्या 8 मार्च रोजी 'महिला दिनाच्या' निमित्तानं या पुतळ्याचं अनावरण होणार आहे. आज (18 फेब्रुवारी) हा पुतळा महाराष्ट्रातून जपानला पाठवण्यात येईल.
छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा घेऊन भारतातील सुमारे तेरा राज्यांतून 8000 किमीचा प्रवास केलेल्या 'शिव स्वराज्य' यात्रेचा समारोप सोमवारी (17 फेब्रुवारी) झाला. तर आठ फुटी हे भव्यदिव्य स्मारक मंगळवारी (18 फेब्रुवारी) स्पेशल विमानाद्वारे जपान येथे पाठविण्यात येणार असल्याची माहिती 'आम्ही पुणेकर' संस्थेचे अध्यक्ष हेमंत जाधव यांनी यावेळी दिली.
भारत आणि जपानमधील मैत्री अजून दृढ व्हावी : यासंदर्भात अधिक माहिती देत हेमंत जाधव म्हणाले की, "आम्ही पुणेकर या संस्थेच्या वतीनं जपानची राजधानी टोकियो येथे येत्या 8 मार्च रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्यदिव्य स्मारक उभारण्यात येणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी भांडारकर प्राच्य विद्यालय आणि इतिहास संशोधक मंडळाच्या वतीनं देण्यात आलेले दुर्मिळ खजिन्याचे (वस्तूंचे) संग्रहालय उभारण्यात येणार आहे. भारत आणि जपान या देशांमधील मैत्री अजून दृढ व्हावी, हे यामागचं उद्दिष्ट आहे."
100 वर्ष स्मारकाला काहीही होणार नाही : पुढे म्हणाले की, "छत्रपती शिवाजी महाराज यांचा हा पुतळा 8 फुटी आहे. ज्येष्ठ शिल्पकार विवेक खटावकर यांनी हा पुतळा तयार केला. जपानच्या भौगोलिक रचनेमुळे तिथे नेहमी भूकंप तसंच सुनामी येत असते. या सर्व बाबी लक्षात घेऊन हे स्मारक बनविले आहे. पुढील 100 वर्ष या स्मारकाला काहीही होणार नाही," असा दावाही जाधव यांनी केला.
हेही वाचा -