Alia Bhatt Visits Delhi : आलीया भट कोविड नयम मो़डून दिल्लीला गेल्याने गुन्हा दाखल होण्याची शक्यता - आलिया भट्ट कोव्ही़ड चाचणी निगेटीव्ह

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Dec 16, 2021, 9:32 AM IST

Updated : Dec 17, 2021, 10:17 AM IST

मुंबई - होम क्वारंटाईनच्या नियमांचं उल्लंघन करुन एका दिवसाच्या कामाकरता अभिनेत्री आलीया भट (Alia Bhatt) दिल्लीला पोहचली. आलीया भट करन जोहरने आयोजित केलेल्या पार्टीत (Alia Bhatt attended Karan Johar Party) सहभागी झाली होती. आलीया भट हाय रिस्क रुग्णाच्या संपर्कात आल्यामुळे बीएमसीने (BMC) ७ दिवसांचे होम क्वारंटाईनचे बंधन घातले होते. मात्र, ५ दिवसांनंतरच आलीया भट दिल्लीत पोहोचली. आपण एका दिवसाच्या कामाकरता दिल्लीला जात असून आपला कोविड रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचे आलियाने पालिकेला कळवले आहे. याच पार्टीतील करिना (Kareena Kapoor) आणि करिष्मा कपुरसह ४ जणांना कोविडची बाधा झाली होती. आलीया भटची कोविड १९ संसर्ग चाचणी निगेटीव्ह आली तरीही मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने ७ दिवस होम क्वारंटाईन रहाण्याचा सल्ला दिला होता. दरम्यान आज तिची चौकशी करण्यात आली. तसेच तिच्या विरोधात आज कोणत्याही क्षणी गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.
Last Updated : Dec 17, 2021, 10:17 AM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.