VIDEO: पुण्यात पर्यटनाला जाताय, सावधान!!! पोलिस असे करतील कारवाई - कोरोनाचे निर्बंध झुगारनाऱ्यावर जुन्नरमध्ये कारवाई

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Jun 24, 2021, 8:24 AM IST

Updated : Jun 24, 2021, 12:30 PM IST

जुन्नर (पुणे)- कोरोनाचे निर्बंध झुगारून वर्षाविहारासाठी उत्तर पुणे जिल्ह्यातल्या ऐतिहासिक नाणेघाट व दऱ्याघाट परीसरात पर्यटक गर्दी करत आहेत. गर्दी केलेल्या पर्यटकावर जुन्नर पोलिसांद्वारे कारवाई केली जात आहे. पोलीसांनी केलेल्या कारवाईत 1 जून ते 23 जून अखेर तब्बल 853 जणांवर केसेस करत 2 लाख 98000 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. पर्यटन स्थळावर बंदी असताना प्रवेश करणे, सामाजिक अतंर न पाळणे, मास्क न लावणे या कारणावरून पर्यटकांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. माळशेज घाटात दरड कोसळण्याची भीती आहे. त्यामुळे पर्यटकांचा ओघ आता जास्त करून नाणेघाट व दऱ्या-घाटाकडे वाढत आहे. तालुक्यातील पर्यटन स्थळे बंद आहेत. त्यामुळे पर्यटनासाठी बाहेर पडु नका, असे आवाहन जुन्नर पोलिसांकडून करण्यात आले आहे.
Last Updated : Jun 24, 2021, 12:30 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.