मुंबै बँकेची बदनामी करणार्यांवर मुंबई उच्च न्यायालयात 1000 कोटींचा दावा - प्रवीण दरेकर - Praveen Darekar claims Rs 1000 crore defamation suit
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - मुंबै बँकेची बदनामी करणाऱ्यांवर एक हजार कोटी रुपयांचा दावा ठोकल्याचे बँकेचे अध्यक्ष आणि विधान परिषद विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी सांगितले आहे. एखाद्याने वैयक्तिक किंवा राजकीय बदनामी केल्यास त्याचा फटका केवळ आपल्याला वैयक्तिकरित्या बसत असतो. मात्र, एखाद्या आर्थिक संस्थेची बदनामी केल्यास त्याचा सरळ फटका आर्थिक संस्थेला बसत असतो.
मुंबै बँकेशी जोडले गेल्यानंतर बाराशे कोटीवरून दहा हजार कोटी रुपयांपर्यंत या बँकेचा कारभार नेला. बँकेच्या सुरु असलेल्या सुरळीत कारभारामुळे बँकेला 'अ 'वर्गाचा दर्जा मिळाला. अशा परिस्थितीतही काही लोक जाणून-बुजून बँकेची बदनामी करत आहेत. त्यामुळे मुंबै बँकेने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेऊन दावा केल्याचे प्रवीण दरेकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.