Chandrakant Patil Maratha Reservation Issue : 'मराठा आरक्षण प्रश्नावरुन मंगळवारपासून आम्ही आक्रमक भूमिका घेणार' - मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून भारतीय जनता पक्ष आंदोलन
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्य सरकारने कोणतीही प्रगती केलेली नाही. संभाजी राजे छत्रपती यांनाही मराठा समाजाच्या मागण्यांसाठी उपोषणाला बसाव लागले. उपोषण सोडताना त्यांच्या 15 मागण्या राज्य सरकारने मान्य केल्या. त्या मागण्यांबाबत देखील राज्य सरकारकडून कोणतीही प्रगती झालेली नाही. सामान्य मराठा माणसाला तर फसवले जात आहे. पण संभाजीराजे छत्रपती यांना देखील राज्य सरकार फसवत असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारवर केला आहे. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणावर स्थगिती आल्यामुळे ही परिस्थिती मराठा समाजाची झाली आहे. मात्र आता मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर भारतीय जनता पक्षात गप्प बसणार नाही. उद्यापासून मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून भारतीय जनता पक्ष अधिवेशनात आक्रमक होईल, असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:20 PM IST