Child Dance On Zingat Song : विटभट्टीवरील बच्चे कंपनीचा पाण्याच्या हौदात 'झिंगाट' डान्स - लहान मुलांचे झिंगाटवर डान्स
🎬 Watch Now: Feature Video

ठाणे - उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत असतानाच शहरासह ग्रामीण भागातही उन्हाची काहिली नागरिकांना सहनशीलतेच्या पलीकडे गेल्याने घामाच्या धारा अंगातून वाहत आहेत. त्यामुळे शहर भागात नागरिक विविध थंडपेय पिऊन उन्हापासून बचाव करत असल्याचे दिसून येतात. मात्र, ग्रामीण भागात मार्च महिन्यातच नदी, तलाव आटल्याने पाण्याची वणवण सुरु झाली आहे. अशातच भिवंडी तालुक्यातील एका आदिवसी पाड्यात वीटभट्टीवर राहणाऱ्या बच्चे कंपनी उन्हाच्या तडाख्याने हैराण झाली आहे. आता या बच्चे कंपनीसाठी पाण्याचा हौद तयार केला आहे. या पाण्याच्या हौदामध्ये बच्चे कंपनी झिंगाट डान्स करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला ( Child Dance On Zingat Song ) आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:22 PM IST