Babanrao Lonikar Audio Clip : 'त्या' व्हायरल क्लीपबाबत लोणीकरांचे स्पष्टीकरण; म्हणाले, माझे वीज मीटर... - बबनराव लोणीकर मराठी बातमी
🎬 Watch Now: Feature Video
जालना - भाजपाचे आमदार बबनराव लोणीकर यांच्या औरंगाबादमधील बंगल्याचे विजमीटर थकीत बिलाअभावी महावितरणच्या अभियंत्याने काढून नेले. त्यावरुन लोणीकर त्या अभियंत्याला शिवीगाळ करत असल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल ( Babanrao Lonikar Audio Clip ) झाली. याप्रकरणी आता बबनराव लोणीकर यांनी आता स्पष्टीकरण दिले आहे. ही ऑडिओ क्लिप माझी नाही. त्याशिवाय माझ्या औरंगाबाद मधील बंगल्याचे विजमीटर कोणीही काढले नाही. त्यामुळे शिवीगाळ करण्याचे कामच काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच, ही ऑडिओ क्लिप कोणीतीरी एडिट करुन सोशल मीडियावर व्हायरल करत असल्याचेही लोणीकर यांनी म्हटलं आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:21 PM IST