औषध आणायला गेलेल्या युवकाला जिल्हाधिकाऱ्याने मारली कानाखाली; व्हिडिओ व्हायरल.. - छत्तीसगड कलेक्टर व्हायरल व्हिडिओ
🎬 Watch Now: Feature Video
रायपूर : छत्तीसगडच्या सूरजपूरचे जिल्हाधिकारी रणवीर शर्मा यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. यामध्ये ते लॉकडाऊनमध्ये बाहेर पडलेल्या एका तरुणाला कानाखाली मारताना दिसून येत आहेत. तसेच या युवकाचा मोबाईलही त्यांनी जमीनीवर आपटून फोडल्याचे यात दिसून येत आहे. आपण औषधे आणायला चाललो असल्याचेही हा तरुण वारंवार सांगतो. मात्र, त्याचे काही एक ऐकून न घेता, जिल्हाधिकाऱ्यांनी त्याला केलेल्या मारहाणीचा सध्या सर्व स्तरातून निषेध व्यक्त होतो आहे. तर या युवकाने गैरवर्तन केल्यामुळे आपण हात उचलल्याचे सांगत जिल्हाधिकाऱ्यांनी माफी मागितल्याचा आपला एक व्हिडिओही जारी केला आहे...