Jyotirlinga Mahakaleshwar Darshan : भोलेनाथाच्या दर्शनाने नववर्षाची सुरूवात; भाविकांची मोठी गर्दी - उज्जैन महाकालेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर
🎬 Watch Now: Feature Video

आज 2022 या नव्या वर्षात आपण प्रवेश केला आहे. नवीन वर्ष 2022 च्या पहिल्या दिवशी उज्जैन येथील महाकालेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरात भोलेनाथाचे दर्शन आणि आशिर्वाद घेण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक ( devotee Visiting Jyotirlinga Mahakaleshwar to Darshan) आले होते. सकाळपासूनच भाविकांची मोठी रांग लागली होती. कोरोना प्रोटोकॉल अंतर्गत भाविकांना मास्क घालणे बंधनकारक करण्यात आले आहे. मंदिराच्या दर्शनासाठी राज्याबाहेरूनही भाविक पोहोचले आहेत. नववर्षाच्या पहिल्या दिवशी उज्जैनच्या हरसिद्धी मंदिर, गडकालिका मंदिर, मंगलनाथ मंदिर आणि काळभैरव मंदिरात भाविकांची ये-जा सुरूच आहे.