दोन्ही हात नसतानाही पायांनी सुरेख चित्र काढणारी महिला - अंजना मलिक चित्रकला
🎬 Watch Now: Feature Video

देहराडून- उत्तराखंड येथील अंजना मलिक नावाची अपंग महिला आपल्या पायाने सुरेख चित्र काढते. तिने बनवलेल्या पेंटिंग सातासमुद्रापार प्रसिद्ध आहेत. अंजना यांना दोन्ही हात नसून भीक मागून त्या उदरनिर्वाह करत होत्या. मात्र, एका परदेशी महिलेने त्यांना पायाने चित्र काढायला शिकण्याचा सल्ला दिला. त्यानंतर प्रयत्नांची पराकाष्ठा करत सुरेख अशी चित्र काढायला त्या शिकल्या. आता अंजना ऋषिकेश येथील मायाकुंड येथे आपली कला विकून उदरनिर्वाह करतात. त्यांची चित्रकला नक्कीच अपंगांना प्रेरणा देणारी ठरली आहे.