Varsha Gaikwad Resolution 2022 : 'महाराष्ट्राला शिक्षण क्षेत्रात आधुनिक पद्धतीने विकसित करण्याचा मानस' - शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांचा नवीन वर्षे संकल्प
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - नवीन वर्षाला नवीन संकल्प करत असताना महाराष्ट्राला शिक्षण क्षेत्रामध्ये आधुनिक पद्धतीने अजून किती पुढे घेऊन जाता येईल, याबाबत विचारविनिमय करण्यात आलेला आहे. सायन्स सिटी असेल, डिजिटल शिक्षण असेल, त्याचबरोबर अभ्यासक्रमात बदल करण्याबाबत असेल या सर्वांमध्ये नवीन पद्धतीने बदल केले जातील. लायब्ररी असेल त्यामध्ये सुद्धा आधुनिक बदल करून विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त शिक्षण सोप्या पद्धतीने कसे उपलब्ध होईल, याबाबत आमचा विचार असणार आहे. हेच व्हिजन कायम ठेवत त्याच्यावर जास्तीत जास्त काम करण्याचा आमचा मानस असणार आहे. आता पुढील वर्षी विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊ नये, त्याच पद्धतीने केंद्राकडून विद्यार्थ्यांना लस उपलब्ध झाली तर ती लवकरात लवकर त्यांना देऊन शिक्षणामध्ये कुठेही बाधा येणार नाही, यासाठीचा आमचा संकल्प असणार आहे, अशी भावना शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ईटीव्ही भारतशी बोलतांना व्यक्त केली आहे.