प्लास्टिकला उत्तम पर्याय : रिंगाल

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : May 17, 2021, 7:23 PM IST

हैदराबाद - आपल्याकडच्या दुर्गम पर्वतांमध्ये अशा अनेक अद्भूत नैसर्गिक देणग्या आहेत. ज्या अजुनपर्यंत जगासमोर आलेल्या नाहीत. संरक्षणाअभावी त्या नष्ट होत आहे. अशीच एक गोष्ट म्हणजे रिंगाल ही आहे. रिंगाल ही उत्तराखंडमध्ये आढळणारं विविधपयोगी वनस्पती आहे. ही बांबूच्या कुटुंबातील प्रजाती असल्याचं म्हटले जाते. उत्तराखंडमध्ये याला 'बौना बास' या नावाने ओळखले जाते. रिंगाल वनस्पती समुद्रसपाटीपासून एक हजार ते सात हजार फूट उंच भागात आढळते. मात्र, ती बांबूसारखी उंच आणि लांब नसते. याची उंची 10 ते 12 फुटापर्यंत असते. तसेच बांबूच्या तुलनेत ही खूपच पातळ असते. या वनस्पतीच्या वाढीसाठी पाणी आणि ओलावा आवश्यक आहे. रिंगालचे वैशिष्ट्य म्हणजे या वनस्पतीमुळे जंगलात आग लागण्याच्या घटना घडत नाही. पर्यावरणाचे संतुलन कायम ठेवण्यासह हे भूस्खलन रोखण्यातही फायदेशीर आहे. या वनस्पतीचा खरा उपयोग पर्यावरणवादी जगतसिंह जंगली करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.