VIDEO : दिल्लीतील निर्भया बलात्काराच्या घटनेला आठ वर्ष पूर्ण - निर्भया बलात्कार बातमी
🎬 Watch Now: Feature Video

राजधानी दिल्लीत आठ वर्षांपूर्वी म्हणजेच २०१२ साली चालत्या बसमध्ये बलात्काराची घटना घटना घडली होती. या घटनेनंतर संपूर्ण देश हादरला होता. निर्भया असे या पीडितेला नाव देण्यात आले आणि महिला सुरक्षेची चळवळ संपूर्ण देशात ऊभी राहीली. दिल्लीसह देशभरात आंदोलन झाले. आरोपींना अखेर यावर्षी मार्च महिन्यात फाशीची शिक्षा देण्यात आली. निर्भया प्रकरणातील आरोपींचे वकील ए. पी सिंह यांनी ईटीव्ही भारतशी संवाद साधला. महिला अत्याचाराविरोधात कठोर कायदा करण्यात आला असूनही महिलांविरोधातील गुन्हे घडत आहेत, असे सिंह म्हणाले.