देवाचे मंदिर बनवणारे सहारनपूरमधील 'अल्लाहचे बंदे', देतात हिंदू-मुस्लिम ऐक्याचा संदेश - muslims make temples saharanpur news
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-9345956-thumbnail-3x2-video.jpg)
सहारनपूर (उत्तर प्रदेश) - आपला देश हा विविधतेत एकतेच्या रुपाने ओळखला जातो. विविधतेत एकतेचा संदेश देणाऱ्या काही लोकांची गोष्ट आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. सहारनपूरमध्ये एक नाही तर अशा हजारो नागरिकांत आपल्याला एकतेचं दर्शन घडेल. हे तुमच्या आमच्या सारखेच सामान्य नागरिक आहेत. वूडन कार्विंगच्या व्यवसायाशी जुळलेले हे लोकं सुंदर नक्षीकामातून देवाचं मंदिर घडवतात. विषेश म्हणजे या व्यवसायातील 90 टक्क्याहुन अधिक नागरिक हे मुस्लिम समाजातील आहेत.