मुस्लीम व्यक्तीने उभारले हिंदू मंदिर; कर्नाटकात धार्मिक एकात्मतेचा आदर्श - कर्नाटक रामनगर हिंदू मंदिर
🎬 Watch Now: Feature Video
बंगळुरू : सर्वधर्म सहिष्णूतेसाठी भारत ओळखला जातो. विविधतेत एकता ही आपली संस्कृती आहे. देशात अनेक वर्षांपासून हा सर्वधर्म समभाव कायम आहे. त्याचंच उदाहरण कर्नाटकातील रामनगर जिल्ह्यात बघायला मिळतंय. येथे एका मुस्लीम व्यक्तीने स्वखर्चाने हिंदू मंदिराचं निर्माण केलंय. सैयद सादत असं या व्यक्तीचं नाव आहे. सैयद यांनी चेन्नापटना तालुक्यातील संथे मोगेनहल्ली गावात या मंदिराची उभारणी करून धार्मिक एकात्मतेचा संदेश दिलाय.