ईटीव्ही भारत Exclusive : शेतकरी आंदोलनाबाबत मेधा पाटकर यांची विशेष मुलाखत.. - शेतकरी किसान मोर्चा मेधा पाटकर
🎬 Watch Now: Feature Video
चंदिगढ : दिल्लीमध्ये सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनामध्ये सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकरही सहभागी झाल्या आहेत. ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधींनी आज होणाऱ्या ट्रॅक्टर रॅलीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी त्या म्हणाल्या, की सरकार जर कृषी कायद्यांमध्ये बदल करण्यास तयार आहे, तर त्याचाच अर्थ हे कायदे सदोष आहेत. अशा परिस्थितीमध्ये तातडीने हे तीनही कायदे मागे घेण्याचा निर्णय सरकारने घ्यायला हवा. तसेच, यावेळी पाटकरांनी सरकारवर आणि अंबानीवरही निशाणा साधला. पाहा त्यांची ही विशेष मुलाखत...