Nawab Malik Resolution 2022 : 'दरवर्षी २ लाख लोकांना रोजगार देण्याचा संकल्प' - अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचा नवीन वर्षे संकल्प
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - नवीन वर्षामध्ये नवीन संकल्प करत असताना आमच्या विभागाकडून दरवर्षी २ लाख लोकांना रोजगार देण्याचे ठरवण्यात आलेले आहे. तसेच हा आकडा प्रत्येक वर्षी २ लाखाने वाढत जाणार आहे. याचा अर्थ पुढल्या वर्षी २ लाख लोकांना, त्याच्या पुढच्या वर्षी अजून २ लाख लोकांना रोजगार दिला जाणार आहे. विशेष म्हणजे यामध्ये जे रोजगार उपलब्ध होतील किंवा ज्या कंपनीमध्ये कामगार कामाला लागतील, त्या सर्वांना १५००० रुपये पगार दिला जाणार असून सरकारच्या माध्यमातून अतिरिक्त ५००० रुपये त्यांना दिले जाणार आहेत. २०२२ पासून या योजनेची सुरुवात होणार असून बेरोजगारी दूर करण्यासाठी महत्त्वाचा असा हा संकल्प पुढील वर्षापासून आम्ही हाती घेत आहोत, अशी भावना व संकल्प अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी ईटीव्ही भारतशी बोलतांना व्यक्त केला आहे.