Bacchu Kadu Resolution 2022 : 'शैक्षणिक विषमता निर्माण होवू नये, हाच संकल्प' - मंत्री बच्चू कडू यांचा नवीन वर्षे संकल्प
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - गेल्या दोन वर्षांत मोठ्या प्रमाणात हानी झाली होती. प्रत्येक घराला त्याची झळ बसली आहे. गेली दोन वर्ष अतिशय दुःखद होते. गेले सरकारही अडचणीत होते. माझ्याकडे पाच खाते असून अनेक प्रश्न मार्गी लावण्याचा मी प्रयत्न केला. अपंगांसाठी गाडगे बाबा घरकुल योजना काढली. पुढील वर्षी जलसंपदा विभागामार्फत जिथे-जिथे पुनर्वसन झाले आहे. तिथे जाऊन ज्या काही अपुरे व्यवस्था आहेत, त्या दुरुस्त करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. शिक्षण विभागात पालक आणि विद्यार्थ्यांना जो त्रास होत आहे. त्यातही बदल करण्याचा मानस आमचा आहे. त्याबाबत लवकरच एक चांगले विधेयक राज्य सरकार आणेल. या वर्षात मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले होते. त्यामुळे शैक्षणिक विषमता तयार झाली आहे. समाजात आर्थिक विषमता तयार झाली तरी चालेल. मात्र शैक्षणिक विषमता तयार होऊ नये, यासाठी काम करण्याची गरज आहे आणि सरकार त्यासाठी प्रयत्नशील राहणार, असा संकल्प राज्यमंत्री बच्चू कडू यांनी ईटीव्ही भारतशी बोलतांना व्यक्त केला आहे.