केरळच्या मुलीने 400 मीटर लांबीचे काढले कार्टून; गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंद - केरळ मुलगी गिनीज बुक रेकॉर्ड
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-12697203-thumbnail-3x2-asdd.jpg)
तिरुवनंतपुरम - तुम्ही कार्टून अनेकवेळा पाहिले असेल. पण, केरळच्या मुलीने काढलेले कार्टून खास ठरले आहे. एवढेच नव्हे तर गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डला या कार्टुनची दखल घ्यावी लागली आहे. कारण, हे साधेसुधे नाही तर चक्क 400 मीटर लांबीचे कार्टून आहे. आहे ना कमाल? एवढे लांब कार्टून काढणारी चित्रकार रोशना ही केवळ 19 वर्षांची आहे. तिने दुबई ग्लोबल व्हिलेज सिजन 25 मध्ये 25 आंतरराष्ट्रीय पुरस्कार पटकाविलेले आहेत. विशेष म्हणजे अशी कामगिरी करणारी ती पहिली भारतीय आहे. ग्लोबल व्हिलेज सिझनमध्ये रोशनाने 400 मीटर कार्टुन काढले. हे संपूर्ण कार्टून काढण्यासाठी तिला 20 दिवस लागले. रोशनाचे वडिल एम. दिलीफ हे कार्टुनिस्ट आहेत. तर तिची आई सुबैदा ही सिव्हिल इंजिनिअर आहे.