Jitendra Awhad Resolution 2022 : 'रखडलेले झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प मार्गी लावणार' - गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा नवीन वर्षे संकल्प
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - बीडीडी चाळ प्रकल्प, पत्रा चाळ पुनर्विकास प्रकल्प, मोतीलाल नगर प्रकल्प आणि कामाठीपुरा पुनर्विकास प्रकल्प नवीन वर्षासाठी आमचे महत्त्वाचे प्रकल्प आणि संकल्प आहे. या प्रकल्पांना मार्गी लावणे हाच नवीन वर्षातील आमचा उद्देश असेल. सर्वसामान्यांसाठी म्हाडाच्या माध्यमातून अनेक घरांची लॉटरी काढली जाते. त्यामाध्यमातून आता पुणे, नागपूर, कोकण या परिसरातही लोकांसाठी घरे उपलब्ध करून दिली जात आहेत. रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प नाही, कशाप्रकारे नवीन वर्षात मार्गी लावता येईल, याचे धोरण आम्ही आखत आहोत. जेवढे शक्य आहे तेवढे प्रकल्प मार्गी लावून गरिबांना घरे देण्याबाबत आम्ही सकारात्मक असणार, असा संकल्प गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ईटीव्ही भारतशी बोलतांना व्यक्त केला आहे.