झारखंड : सरकारने मनावर घेतले तर काजू उत्पादकांना 'अच्छे दिन' शक्य - Jamtara cashew crop News
🎬 Watch Now: Feature Video
झारखंडची राजधानी रांची इथं काजूची किंमत 600 ते 900 रुपये प्रति किलो आहे. पण हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल की, इथून 200 किमी अंतरावर असलेल्या जामताडा इथं काजूचा किलोमागे केवळ 20 ते 30 रुपये दर आहे. जामताडामध्ये काजूच्या लागवडीला भरपूर वाव आहे. प्रशासनानं काजू लागवड विकसित करण्यासाठी आणि इथं प्रक्रिया प्रकल्प उभारण्याची गरज आहे. यामुळे राज्यातील लोकांना केवळ रोजगारच मिळणार नाही तर, काजू उत्पादनासाठी झारखंडचं नावही देशभरात ओळखलं जाईल. सरकारनं मनावर घेतलं आणि काजू व्यवसायाला अधिक चांगली दिशा दिली तर, लोकांचं जीवन बदलू शकेल, असं स्थानिक लोकांचं म्हणणं आहे.