VIDEO : कडाक्याच्या थंडीचा आमच्यावर परिणाम नाही, काय म्हणतायेत सिंघू बॉर्डरवरील शेतकरी - शेतकरी आंदोलन बातमी
🎬 Watch Now: Feature Video

नवी दिल्ली - हजारो शेतकरी केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सिंघू सीमेवर आंदोलन करत आहेत. आंदोलनाला २० दिवस उलटून गेले असून सध्या दिल्लीत कडाक्याची थंडी पडली आहे. मात्र, या थंडीचा आमच्यावर काहीही परिणाम होत नसल्याचे शेतकरी म्हणत आहेत. थंडीमुळे आत्तापर्यंत पाच शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. मात्र, जोपर्यंत सरकार कायदे रद्द करत नाही, तोपर्यंत माघे हटणार नाही, असा शेतकऱ्यांचा निर्धार आहे. पाहा काय म्हणतायेत शेतकरी....