गुलाबशेती वाचवण्यासाठी तयार केले सहा कोटी लीटर क्षमतेचे शेततळे! - डोडबल्लापुरा शेततळे व्हिडिओ
🎬 Watch Now: Feature Video
बंगळुरू - शेती विकायची नसते, तर राखायची असते हे आपल्या सर्वांनाच माहित आहे. आपली फुलांची शेती टिकवण्यासाठी एका शेतकऱ्याने एकापाठोपाठ १२ वेळा बोरअवेल घेतले. यासाठी त्याचे ४० लाख रुपये खर्च झाले. मात्र, याचा त्याला फायदा झाला नाही. जमिनीच्या खालून पाणी येत नाही म्हटल्यावर या शेतकऱ्याने आकाशातून येणाऱ्या पाण्याचा आधार घ्यायचे ठरवले आणि त्याने सहा कोटी लीटर पाणी साठवण्याची क्षमता असलेले शेततळे तयार केले. डोडबल्लापुरा तालुक्यातील डोड हज्जाजी गावात राहणाऱ्या रविकुमार यांनी हे शेततळे तयार केले आहे. त्यांच्या शेतातील १२ प्रकारचे गुलाब कित्येक देशांमध्ये निर्यात केले जातात. या शेतीतून ते लाखो रुपयांचे उत्पादन घेतात. सोबतच त्यांनी गावातील १५० हून अधिक नागरिकांना रोजगारही दिला आहे.