VIDEO : शेजाऱ्याने केला महिलेवर चाकू हल्ला; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद.. - दिल्ली शेजारी चाकू हल्ला
🎬 Watch Now: Feature Video
नवी दिल्ली : शहराच्या शाहबाद डेअरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत, एका व्यक्तीने आपल्या शेजारी राहणाऱ्या महिलेवर चाकूने हल्ला केला. यामध्ये महिला गंभीर जखमी झाली. रोहिणी सेक्टर ११ परिसरसात ही घटना घडली. यामध्ये जखमी महिलेचे नाव रेणू असल्याचे समजत आहे, तर आरोपीचे नाव नरेश (वय ५०) असल्याची माहिती समोर आली आहे. हल्ल्यानंतर आरोपी फरार झाला असून, त्याचा शोध सुरू आहे. तसेच, महिलेवर सफदरजंग रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, ही सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली..