हा देश फक्त चार लोक चालवत आहेत - राहुल गांधी - बाजार समित्या बंद करण्याचा सरकारचा डाव राहुल गांधी
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-10587321-815-10587321-1613052261091.jpg)
नवी दिल्ली - काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना केंद्र सरकारच्या तिन्ही कृषी कायद्यांवर टीका केली. हा देश फक्त चार लोक चालवत असल्याचे ते म्हणाले. बाजार समित्या बंद करण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला. त्यांच्या भाषणावेळी भाजपच्या खासदारांनी मोठ्या प्रमाणात सभागृहात गदारोळ घातला.