ओडिशा..जिथे हातमाग कलेतूनही ओझरते देशभक्ती - ओडिशा हातमाग लेटेस्ट न्यूज
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-11446934-thumbnail-3x2-haatmag.jpg)
ओडिशाचे हातमाग, विणकाम तिथल्या कलात्मक कामांचे उत्तम उदाहरण आहे. सुबर्णपूर जिल्ह्याला या हातकामाचं जन्मस्थान मानले जाते. रंगीत दोऱ्यांमध्ये करण्यात आलेलं काम खूप आकर्षक आहे. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंतच्या अखंड भारताचा नकाशा एका साडीवर सुंदरतेनं विणण्यात आला आहे. या साडीत २८ राज्यांची नावंही विणण्यात आली आहेत. सोबतच शेतकऱ्यांनाही इथे महत्त्व देण्यात आलंय. 'जय जवान जय किसान' सोबत 'आय लव माय इंडिया'सारखे घोषवाक्यही या साडीवर पाहायला मिळतात. या साडीवर सुंदर विणकाम करणारे ईश्वर मेहर सुबर्णपूरमधील डुंगरिपल्लीचे रहिवासी आहेत. त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी त्यांच्या या कल्पनेला सत्यात उतरवण्यासाठी मदत केलीय. तर पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनीही त्यांच्या या कलेचं कौतुक केल आहे.