अशोक कुमार; पंजाब पोलिसांमधील 'कलाकार' - पंजाब पोलीस कलाकार अशोक कुमार
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-10529786-thumbnail-3x2-police.jpg)
हैदराबाद - पंजाब पोलिसांवर नेहमी कडक असण्याचा आरोप लावला जातो. मात्र, या व्यतिरिक्तही पंजाब पोलिसांची आपली एक वेगळी ओळख आहे. पंजाब पोलिसांमध्ये कार्यरत असलेल्या एका कॉन्स्टेबलने काढलेली चित्र सध्या लोकांना आकर्षित करत आहेत. जालंधरमध्ये कार्यरत असलेले कॉन्स्टेबल अशोक कुमार यांच्या चित्रकलेचा तीन वेळा इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये समावेश करण्यात आला आहे. अशोक कुमार सुरुवातीला चंदीगडमधील प्रसिद्ध सुखाना तलावाजवळ लोकांची चित्रे बनवण्याचे काम करत. नंतर त्यांची पंजाब पोलीस दलात नियुक्ती झाली.