छत्तीसगडच्या 'डांडपारा' बेटावरील शेतीचा अनोखा प्रयोग - डांडपारा बेट शेती प्रयोग
🎬 Watch Now: Feature Video
हैदराबाद - अडचणींवर उपाय शोधून मेहनत केली की, यश नक्कीच मिळते. ही गोष्ट पवन, बृज आणि अशोकसाख्या ८० शेतकऱ्यांनी सिद्ध करून दाखवले आहे. या 80 शेतकरी कुटुंबांनी डांडपारा बेटावर शेती सुरू केली आहे. दोन दशकांपूर्वी कोरबा जिल्ह्यापासून जवळपास २५ किलोमीटर दूर असलेल्या डांडपाराच्या हसदेव नदीवर हे बेट तयार झाले. नदीला येणाऱ्या नियमित पुरांमुळं हे बेट मोठे होते गेले. नदी किनाऱ्यावरच्या जमिनीवर रहिवासी इमारती बांधल्या गेल्या तेव्हा किनाऱ्यावरील शेतकऱ्यांना कसण्यासाठी जमिन राहिली नाही. त्यावेळी हे बेट 80 कुटुंबांच्या उपजिवीकेचा आधार झाले.