'या' देवाला दाखवला जातो दगडांचा नैवेद्य! - हजारीबाग दगड नैवेद्य
🎬 Watch Now: Feature Video

रांची - देवाने आपले मागणे ऐकावे, यासाठी अनेक गोष्टी केल्या जातात. गणपतीला मोदक आवडतात, म्हणून त्याला मोदकांचा नैवेद्य तर, हनुमानाला लाडू आवडतात म्हणून लाडवांचा नैवेद्य दाखवतो. शंकराला बेलपत्र वाहूनच प्रसन्न करण्याचा प्रयत्न करतो तर, शनिदेवाला तेल वाहतो. मात्र, झारखंडच्या हजारीबागमध्ये असणाऱ्या एका मंदिरामध्ये लोक आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी चक्क दगडांचा नैवेद्य दाखवतात.