'अजम एम्बा', रुचकर आणि चविष्ट अशा पारंपरिक जेवणाची मेजवाणी
🎬 Watch Now: Feature Video
रांची (झारखंड) - आजच्या धावपळीच्या जीवनात फास्टफूड हा लोकांच्या आहारातील एक भाग बनला आहे. वेळेची कमतरता आणि व्यस्तता यामुळे अनेकजण वेळेची बचत म्हणून फास्टफूडचा पर्याय निवडतात. मात्र, घरापासून दूर राहणाऱ्या प्रत्येकालाच घरच्या जेवणाची चव हवी असते. आणि हाच विचार करून रांचीमध्ये अजम एम्बा रेस्टॉरंट सुरू करण्यात आले. अजम एम्बा' हा शब्द झारखंडमधील उरांव आदिवासी समाजाच्या कुडूख भाषेतून घेण्यात आला आहे. याचा अर्थ रुचकर आणि चविष्ट जेवण असा होतो. या ठिकाणी आदिवासींच्या परंपरागत पद्धतीनुसार तयार जेवणाची चव चाखायला मिळते.